bomb threat email wardha district collector Saam tv
महाराष्ट्र

Wardha : बॉम्बने कार्यालय उडविण्याच्या धमकीचा मेल; वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना अजमल कसाब नावाने आला मेल

Wardha News : वर्धा जिल्हाधिकारी अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत इमेल आयडीवर बुधवारी सकाळी सदरचा ईमेल आला. ज्यावेळेस ईमेल आला त्यावेळेस जिल्हाधिकारी या कारंजा घाडगे येथे दौऱ्यावर होते

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमेल वर एक धमकी असलेला मेल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. यात कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा इमेल येताच एकच खळबळ उडाली आहे. पण या इमेलमध्ये कोणत्या कार्यालयाला बॉम्बने उडविणार याबाबत कोणतीच माहिती नव्हती. फक्त जिल्हाधिकारी वर्धा यांच्या इमेल वर प्राप्त झाला. मेल प्राप्त होताच पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालयाची तपासणी केली पण तेथे काहीच आढळले नाही.

वर्धा जिल्हाधिकारी अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत इमेल आयडीवर बुधवारी सकाळी सदरचा ईमेल आला. ज्यावेळेस ईमेल आला त्यावेळेस जिल्हाधिकारी या कारंजा घाडगे येथे दौऱ्यावर होते. हा ईमेल अजमल कसाब खान यांच्या नावाने आला असून ईमेल वाचताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लागलीच बॉम्ब स्कॉड, डॉग स्कॉड आणि एटीएसच्या पथकाने तपासणी केली. यात कार्यालयात काहीच आढळून आले नाही.

विदेशी सर्व्हरवरून मेल 
दरम्यान प्रशासनाने सायबर सेलला या ईमेल आयडीचा स्रोत माहिती करण्याचे निर्देश दिले आहे. प्राथमिक तपासात हा ईमेल विदेशी सर्व्हरवरून पाठविण्यात आल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. सूत्रांच्या माहिती नुसार या इमेल मध्ये एका जागी कोयंबटूर येथे जुमेशा मुबेन यांना सन्मानजनक पद्धतीने दफन करण्यापासून वंचित ठेवल्याचा उल्लेख आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त 

सदर मेल हा चुकीने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेलवर आल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. असे असले तरी कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने वर्धा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच मेल कोठून व कोणी पाठविला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT