Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : वर्धेतून दुचाकी चोरी करत वाशिमला विक्री; आर्वी पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश, २३ दुचाकी जप्त

Wardha News : आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्याचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अश्यातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी होत असल्याच्या घटना घडल्या होत्या. दुचाकी चोरी करणाऱ्याच्या शोधात पोलीस असताना आर्वी पोलिसांनी एका दुचाकी चोरीचा तपास करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. हे चोरटे वर्धा जिल्ह्यातून दुचाकी चोरून वाशीम जिल्ह्यात विक्री करत असल्याचे समोर आले आहे. 

आर्वी पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्याचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अश्यातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड (वय १९, रा. कोसूर्ला) याला दुचाकीसह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरताना आरोपी नयन सोबत वर्धेच्या (Wardha) येसंबा येथील साहिल डोंगरे व दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे चोरटे दुचाकी चोरून वाशीम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आले.

२३ दुचाकी जप्त  
आरोपी हे दुचाकी चोरून (Washim) वाशीम येथे सय्यद सलमान सय्यद साबीर व मोहम्मद फैजल मोहम्मद फिरोज याला विक्री करत होते. पोलिसांनी यांना देखील ताब्यात घेत विचारपूस करत चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणात आतापर्यंत २३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, रामकिसन कासदेकर, दिगंबर रुईकर, अमर हजारें, प्रवीण सदावर्ते, राहुल देशमुख, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT