Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : हनुमान मंदिरात अस्वलाचा धुमाकुळ; मुर्त्यांची केली तोडफोड, बांबरडा गावात रात्रभर भीतीचे वातावरण

Wardha News : वर्धा जिल्ह्याच्या आष्टी शाहिद तालुक्यातील बांबुरडा या गावात रात्रीच्या सुमारास एका अस्वलीने प्रवेश केला. गावाच्या वेशीवर असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन या अस्वलाने धुमाकूळ घातला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : शिकारीच्या शोधात वन्य प्राण्यांचा गाव वस्ती परिसरात वावर वाढला आहे. यात बिबट्याचे प्रमाण अधिक असून बिबट्याकडून हल्ले देखील केले जातात. यातच आता वर्धा जिल्ह्यातील आष्टी शाहिद तालुक्यातील जंगलव्याप्त बांबरडा गावात अस्वलाने प्रवेश केला. गावातील हनुमान मंदिरात अस्वलीने चांगलाच धुमाकूळ घातला. याठिकाणी हनुमान मूर्तीसह मंदिरातील इतर मूर्तीची तोडफोड केली.

वन्य प्राण्यांच्या वावर गाव शिवारात वाढला असून आता अस्वल देखील शिकार व पाण्याच्या शोधात गावात येऊ लागले आहेत. असाच प्रकार वर्धा जिल्ह्याच्या आष्टी शाहिद तालुक्यातील बांबुरडा या गावात रात्रीच्या सुमारास एका अस्वलीने प्रवेश केला. गावाच्या वेशीवर असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन या अस्वलाने धुमाकूळ घातला. दरम्यान मंदिरात अस्वल शिरताच श्वानांनी भुंकण्यास सुरुवात केली. यामुळे गावातील नागरिक जमा झाले होते. 

मुर्त्यांची केली तोडफोड 

कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून गावकरी एकत्र येत मंदिराजवळ जमा झाले. यावेळी अस्वल हनुमान मंदिरात तोडफोड करताना दिसून आली. मंदिरात असलेले शिवलिंग, हनुमान मुर्तीसह इतर मुर्त्यांची तोडफोड केली. दरम्यान पोलिस पाटील यांनी आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी, तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी व तळेगाव ठाणेदार यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांचा ताफा गावात दाखल झाला. 

पिंजरा लावून केले जेरबंद 

सुरुवातीला अस्वलीला मंदिरात कोंडून ठेवण्यात आले होते. यावेळी नागरिक देखील आरोड्या मारत असल्याने अस्वल मंदिरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मंदिरामधून अस्वल पळाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर ग्रामस्थांसह वनविभाग आणि पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून अस्वलीला जेरबंद करण्यात यश आले. अस्वलीला जेरबंद केल्यानंतर जंगलामध्ये सोडून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT