Electric Bus Saam tv
महाराष्ट्र

Electric Bus : वर्ध्यात लवकरच धावणार ५३ इलेक्ट्रिक बसेस; फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळणार बस

Wardha News : पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी या इलेक्ट्रिक बस रस्त्यांवर धावू लागल्या असून आता टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागाला इलेक्ट्रिक बस दिल्या जात आहेत. त्यानुसार वर्धा विभागाला देखील या बस दिल्या जाणार आहेत

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. याचेच एक पुढचे पाऊल म्हणून एसटी महामंडळाच्या वर्धा विभागात तब्बल ५३ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून फेब्रुवारी अखेरपर्यंत रस्त्यावरून धावताना दिसणार आहेत. 

मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहन वापराची संख्या वाढत आहे. अर्थात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले असून आता राज्य परिवहन महामंडळाने देखील निर्णय घेत ताफ्यात इलेक्ट्रिक बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी या इलेक्ट्रिक बस रस्त्यांवर धावू लागल्या असून आता टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागाला इलेक्ट्रिक बस दिल्या जात आहेत. त्यानुसार वर्धा विभागाला देखील या बस दिल्या जाणार आहेत. 

फेब्रुवारी अखेर मिळणार बस 

वर्धा विभागाच्या बस ताफ्यातील डिझेलवर धावणाऱ्या बसेसची संख्या कमी करून पर्यावरणपूरक अशा विद्युत बस चालविण्याचे धोरण विभागाने स्वीकारले आहे. त्यानुसार एका कंपनीकडून बसेसचा पुरवठा केला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाच्या सर्व आगारांमध्ये या बस दिल्या जाणार आहेत. साधारण फेब्रुवारी अखेर पर्यंत वर्धा विभागाच्या ताफ्यात या बस दाखल होणार आहेत. 

आर्वी, सेवाग्राम येथे चार्जिंग स्टेशन 

राज्य परिवहन महामंडळाच्या आर्वी आगाराच्या ताफ्यात २२ तर वर्धा आगाराच्या ताफ्यात ३१ बसेस फेब्रुवारी अखेरपर्यंत दाखल होणार असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर म्हणजे मार्च महिन्यात या बस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. दरम्यान या बसची चार्जिंग करण्याकरिता आर्वी व सेवाग्राम येथे प्रत्येकी एक एकरावर चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT