Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: दहा किलो गांजासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोन महिला ताब्‍यात

दहा किलो गांजासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोन महिला ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सेलू (Selu) तालुक्यातील दोघे समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरस्त्यावर येत गांजा विक्री करीत होते. याचवेळी पोलिसांनी (Police) सापळा रचून त्यांच्यावर छापा मारला. दरम्यान दोन महिलांना अटक करुन १० किलो गांजा जप्त करण्यात आला. (Tajya Batmya)

पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत पूजा मोहीते (रा. सेवाग्राम) आणि हेमा प्रमोद हमद (रा. जाम) असे अटक केलेल्यांची नावे आहे. तर आरोपी आकाश मोहीते हा फरार झाला आहे. पूजा मोहीते आणि आकाश मोहीते हे दोघे दुचाकीने सेलू येथील शिवनगर परिसरातून जाम चोरस्त्यावर हेमा हमद नामक महिलेला गांजा पोहचवून देणार असल्याची माहिती नार्कोटीक सेलला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या सुमारास जाम चौरस्ता परिसरात साध्या गणवेशात गस्त लावून सापळा रचत कारवाई केली. ही कारवाई समुद्रपूर पोलिस ठाण्यातील नार्कोटीक सेलच्या वतीने करण्यात आली. यात दोन महिलांना अटक केली असून एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. आरोपीकडून दहा किलो गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण २ लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT