Audio Clip Viral Saam TV
महाराष्ट्र

Audio Clip Viral : २ तास गावची लाइट गेली, पोरानं थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला; ओएसडींचे उत्तर ऐकून 'बत्ती गुल'

Wardha News : सेलू तालुक्यातील केळझरच्या हर्षल नांनावरे या तरुणाने नेहमी वीज पुरवठा खंडित होत असल्याने मुख्यमंत्र्यांना फोन केला.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha News : राज्यातलं सरकार हे सर्वसामन्यांच सरकार आहे, हे अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगताना दिसतात. मात्र सर्वसामान्य जनता मुख्यमंत्र्यांपर्यंत सहज पोहचू शकते, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या एका युवकाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन लावला.

फोन उचलणाऱ्या ओएसडीने प्रथम दोन तास लाईन गेली, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन लावता का? असं म्हटलं. मात्र नंतर शांतपणे तरुणाच्या समस्येचं उत्तर देखील दिलं. ऑडिओ क्लिपनुसार, सेलू तालुक्यातील केळझरच्या हर्षल नांनावरे या तरुणाने नेहमी वीज पुरवठा खंडित होत असल्याने मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्या संभाषणची क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. साम टीव्ही मात्र व्हायरल क्लिपची पुष्टी करत नाही.

व्हायरल संभाषण जसंच्या तसं

हर्षल नांनावरे - हॅल्लो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलत आहेत का?

ओएसडी - नाही बोला मी त्यांचा ओएसडी बोलतो आहे, तुम्ही कोण?

हर्षल नांनावरे - मी केळझर येथून बोलत आहे तालुका सेलू, जिल्हा वर्धा.

ओएसडी - बरं बरं, बोला बोला.

हर्षल नांनावरे - आमच्याकडली लाईन गेली आहे. मगासपासूनची आली नाही. आतापर्यंत आम्ही MSEB ला फोन लावला होता, लागत नाही तिकडे.

ओएसडी - कधी गेलीय लाईन?

हर्षल नांनावरे - दोन तास झाले.

ओएसडी - दोन तासात लाईन गेली, तर तुम्ही सीएम साहेबांना फोन करणार काय हो साहेब. सीएम साहेबांच्या थोडं लायकीच तरी काम सांगत जा हो साहेब. दोन तास लाईट गेली म्हणून फोन लावायचा.

हर्षल नांनावरे - सर MSEB वाले फोन उचलत नाही.

ओएसडी - सीएम साहेब जनतेचे आहेत, जनतेचे फोन घेतात पण त्यांच्या लायक तरी काम सांगा ना. दोन तास वाट पाहू शकत नाही तुम्ही. (Breaking Marathi News)

हर्षल नांनावरे - नाही सर आमचे क्लास होते म्हणून.

ओएसडी - नंबर आहे म्हणून लगेच फोन करायचा का? अरे मित्रा मी ओएसडी बोलतो, मी रॉकेलच्या बत्तीखाली बसून अभ्यास करून अधिकारी झालो आहे.

हर्षल नांनावरे - नाही सर, क्लास होता म्हणून.

ओएसडी - असं नसतं करायचं मित्.रा तुझ्या भावना कळल्या परंतु तुला पर्यायी गोष्टी आहे. मोबाईलची लाईट आहे, दोन तास नाही होत.  (Latest Marathi News)

हर्षल नांनावरे - ठीक आहे.

ओएसडी - दोन तासासाठी कुठं सीएमना फोन लावत का रे.

हर्षल नांनावरे - सॉरी सॉरी.

ओएसडी - सॉरी वगैरे नाही, परंतु काय कर MSEB ला फोन लाव, वादळ-पाऊस आहे का तिथं आता.

हर्षल नांनावरे - नाही सर गेला येऊन कधीचा

ओएसडी - पाऊस वगैरे असलं तर प्रीकॉशनरी मेजर म्हणून बंद करतात लाईट आणि पुन्हा एकदा चेक करतात. एखाद्याला ओल्यामुळे शॉक लागू नये आणि सारं सिस्टम चेक करून मग लाईट येते, ठीक आहे.

हर्षल नांनावरे - हो ठीक आहे सर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Indian Squad: मुंबईची पलटण तयार ! आगामी हंगामात या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? आठवलेंच्या दाव्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट

Nagpur Accident : पिकनिकला निघालेली शाळेची बस उलटली; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरातील दुर्दैवी घटना

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Madhur Bhandarkar: 'सुपरस्टारची पत्नी होणे सोपे नाही....' ; पाहा मधुर भांडारकरचा आगामी चित्रपट

SCROLL FOR NEXT