Wardha Crime News SAAM T
महाराष्ट्र

Wardha Crime News: आधी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं, दारू पाजली; नंतर अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Wardha News: आधी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं, दारू पाजली; नंतर अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Satish Kengar

>> चेतन व्यास

Wardha Crime News:

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास घडली.

या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्वी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी १७ वर्षीय मुलीला अशपाक आणि शुभम नामक तरुणांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं. तिला गावाबाहेरील रस्त्यावर नेत कारमध्येच बळजबरीने दारु पाजली. (Latest Marathi News)

नंतर दोघांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि आर्वी पोलिसांचे एक अशी दोन पथके आरोपींच्या मार्गावर आहेत. लवकरच या आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक काळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT