Wardha Crime News Saam TV
महाराष्ट्र

Wardha Crime News : प्रेयसीच्या नादात तरुणाचा जीव गेला! तरुणीने विहिरीत उडी घेताच त्यानेही मारली उडी अन्...

Couple falls in well : परिसरातील नागरिकांनी तरुणीला वाचविण्यासाठी पुढाकार घेत विहिरीतून सुखरुप बाहेर काढले.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha News : वर्धा येथे प्रेमसंबंधातून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेयसी आणि प्रियकरात उडालेल्या खटक्यामुळे रागाच्या भारात प्रेयसीने विहिरीत उडी टाकली. मात्र, तिच्या पाठोपाठ प्रियकरानेही विहिरीत उडी घेतली. ही घटना वर्धमनेरी परिसरात घडली. परिसरातील नागरिकांनी तरुणीला वाचविण्यासाठी पुढाकार घेत विहिरीतून सुखरुप बाहेर काढले. मात्र, तरुणाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Crime News)

वैभव झोटींग (रा. वागदा पुनर्वसन)मनीषा गायकवाड (रा. मायाबाई वॉर्ड आर्वी) या दोघांचे मागील साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मनीषा ही वर्धमनेरी येथे गेली होती. तिला परत आणण्यासाठी वैभव हा त्याच्या मित्रासोबत वर्धमनेरीला गेला होता. तेथून परत आर्वीला येत असताना दोघांत वाद झाला. दरम्यान रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत मनीषाने उडी घेतली तिला वाचविण्यासाठी वैभवनेही मनीषापाठोपाठ विहिरीत उडी घेतली.

मनीषाने विहिरीच्या काठाला घट्ट पकडून ठेवले होते. तिने आरडाओरड सुरु केली. दरम्यान परिसरातील नागरिकांना ही बाब दिसताच त्यांनी मनीषाला दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीबाहेर सुखरुप काढले तर वैभव पाण्याबाहेर न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आशिष गजभिये कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. दोन मोटारपंपाच्या सहाय्याने विहिरीत पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला असून वैभवचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती आशिष गजभिये यांनी दिली.

प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही. तसेच कोणताही निर्णय रागात घेऊ नये असं म्हणतात. मात्र तरुणीने रागाच्या भरात स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये तरुणालाच आपला जीव गमवावा लागला. वर्धामधील सदर घटनेमुळे परीसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.C

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT