Wardha Crime News
Wardha Crime News चेतन व्यास
महाराष्ट्र

Wardha: घरात कोणी नसताना नराधमाचा गतीमंद तरुणीवर अत्याचार; वर्ध्यातील संतापजनक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास -

वर्धा: गतिमंद युवतीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सावंगी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सुकळीबाई गावात घडली आहे. या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. सूरज मेकलवार (२४) असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नावं आहे. सावंगी पोलिसांनी (Police) याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गतिमंद तरुणीच्या घरातील लोकं शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सदर पीडीतेच्या घरी कुणीच नसल्याचा गैरफायदा घेत आरोपी सूरज याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन गतिमंद युवतीवर बळजबरी केली.

सदर घटना पीडीतेच्या घरच्यांच्या लक्षात येताच घरच्यांनी थेट सावंगी पोलीस ठाणे (Savangi Police Station) गाठून याबाबतची माहिती दिली. सावंगी पोलीसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तत्काळ आरोपी नराधमाचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

या घटनेनंतर राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. नुकतंच संपुर्ण राज्याला हादरवणाऱ्या भंडारा (Bhandara) बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षितचेचा मुद्दा चर्चेत आला होता.

हे देखील पाहा -

त्यानंतर सरकारने अत्याचार करणाऱ्या नराधमांवरती कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं असलं तरी देखील महिलांवरील अत्याचारांच्या काही कमी होत नाहीत. त्यामुळे अशा नराधमांना गैरकृत्य करताना भिती वाटावी अशी यंत्रणा प्रशासनाने राबवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

Ambajogai Crime : ४८ लाख रुपयांची घरफोडी आली उघडकीस; तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात

Palghar Politics: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Rohit Pawar News | बारामतीत पैसे वाटले, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT