Bajaj Institute of Technology College 29 students of food poisoned SaamTV
महाराष्ट्र

Wardha News : मेसच्या जेवणाने २९ विद्यार्थ्यांना विषबाधा, मळमळ-उलटीनं लेकरं हवालदिल; पालकांचा कंत्राटदारावर गंभीर आरोप

Wardha Hostel 29 students Poisoned Eating Food : आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत भेट देत केली तपासणी केली आहे. पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असून अन्नाच्या नमुन्यासाठी एफडीआयला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Prashant Patil

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा : वर्ध्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.वसतिगृतील मेसचे जेवणानंतर २९ विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेसच्या जेवणानंतर मळमळ आणि उलटी अशा प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने हा प्रकार समोर आला. बजाज इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे.

विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेसचे जेवण केल्यावर विद्यार्थ्यांना मळमळ,उलटी वारंवार तक्रार करूनही वसतिगृहातील मेसवर कारवाई होत नसल्याचा पालकांचा गंभीर आरोप आहे. प्राचार्यसह कॉलेज प्रशासनाचे दुर्लक्ष देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नात उरलेले जेवण विद्यार्थ्यांच्या ताटात वाढल्याचा आरोपी पालकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत भेट देत केली तपासणी केली आहे. पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असून अन्नाच्या नमुन्यासाठी एफडीआयला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नेमकी घटना काय?

वर्धाच्या पिंपरी मेघे येथील बजाज इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. काल रविवारी रात्री मेसमधील जेवण जेवल्यावर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास, मळमळ आणी उलटीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना त्रास होताच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. विद्यालयातील एकूण २९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. २९ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी आणी २६ विद्यार्थिंनीचा समावेश आहे.

पालकांचा गंभीर आरोप

वसतिगृहात देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत विद्यार्थ्यांकडून कॉलेज प्रशासनाला वारंवार तक्रार सुद्धा करण्यात आली होती. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जातं होते. मेसेच्या जेवण देणाऱ्या कंत्राटदाराचे केटरिंगचा सुद्धा व्यवसाय असून लग्नात किंवा समारंभात शिल्लक असलेले अन्न विद्यार्थ्यांना देत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विषबाधा झाल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळताच त्यांनी कॉलेज प्रशासनाला भेट दिली. विद्यार्थ्यांना जेवणातून होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.

यापूर्वी जेवणात अळ्या निघाल्याचा फोटोसुद्धा आज विद्यार्थ्यांनी व्हायरल केले आहेत. मेसबाबत पूर्वी केलेल्या तक्रारीची कॉलेज प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाहीय. तर दुसरीकडे मेसचे पूर्ण शुल्क देऊनही विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण आणी नाश्ता मिळत नसल्याचाही आरोप पालकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT