Beed: वक्फ बोर्ड जमीन घोटाळा! एसआयटीकडून एका बड्या अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकाऱ्याला अटक विनोद जीरे
महाराष्ट्र

Beed: वक्फ बोर्ड जमीन घोटाळा! एसआयटीकडून एका बड्या अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकाऱ्याला अटक

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यात मराठवाड्यातील मोठे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी सामिल असल्याचं समोर येत आहे.

विनोद जिरे

बीड: एसआयटीकडून आणखी एका बड्या अधिकाऱ्यांसह (officers) मंडळ अधिकाऱ्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. प्रदीप पांडुळे, नायब तहसील भूम व शिवशंकर गंगाधर सिंघनवाड मंडळाधिकारी आष्टी, असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्रदीप पांडुळे हे अगोदर आष्टी येथे होते तर आता बदली होऊन ते भूम (Bhoom) येथे कार्यरत आहेत. वक्फ बोर्डाची जमिन मदतमाश जाहिर करुन, भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलीसात (police) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये या दोघांनाही मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. (Waqf board land scam SIT arrests board officer)

हे देखील पहा-

मराठवाड्यातील (Marathwada) वक्फ बोर्डाच्या जवळपास ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप (Allegations) करण्यात आला होता. विशेष म्हणजे यामध्ये मोठमोठे राजकीय नेते आणि महसूल विभागातील बडे अधिकारी सुद्धा सहभागी असल्यचे पुढे येत आहे. तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये मराठवाड्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहेब यांच्या ७१ एक्कर ८९ गुंठे जमीन घोटाळ्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला अटक केल्यावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनिच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे. पण एकट्या आष्टीतच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक देवस्थान आणि वक्फ जमिनिवर भूमाफीयांनी गिळंकृत केली आहेत. तर याप्रकरणी महाराष्ट्रात आतापर्यंत १३ तर मराठवाड्यात ७ गुन्हे दाखल झाले आहेत.

या घोटाळ्यामध्ये फक्त महसूल अधिकारीच नव्हे तर राजकीय दिगग्ज नेत्यांची सुद्धा नावे समोर येत आहेत. भाजप नेते सुरेश धस यांनी देवस्थान आणि वफ्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागांचा घोटाळा केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केला होता. तर या प्रकरणाची अगोदरच चौकशी झाली आहे. आता नेमके यामध्ये कोणत्या बड्या नेत्याचा नाव समोर येणार का?

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

SCROLL FOR NEXT