Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik karad : वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले, परळीत तणाव वाढला

Walmik karad News : वाल्मीक कराड याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. परळीमध्ये टॉवरवर चढत आंदोलन पुकारलेय. वाल्मीक कराडला न्याय द्या.. आशा घोषणा करत टायर पेटवण्यात आले. तगडा पोलीस बंदोबस्त परळीमध्ये आहे.

Namdeo Kumbhar

Walmik karad parli : परळीमध्ये वाल्मीक कराड यांच्या समर्थकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेय. वाल्मीक कराड याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत समर्थक आक्रमक झाले. वाल्मीक कराड यांच्या आईने आज सकाळपासून परळी स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर परळीमध्ये कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत टॉवरवर चढून आंदोलन केले. एकीकडे वाल्मीक कराडला घेऊन सीआयडी न्यायालयात गेली असतानाच दुसरीकडे परळीमध्ये नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

परळीमध्ये कराड समर्थकांनी टॉवरवर चढत आंदोलन केले. आक्रमक झालेल्या समर्थकांनी टायरही पेटवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टायर विझवले, त्याशिवाय गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. टॉवरवर चढत आंदोलन करताना कराड समर्थकांमधील एक आंदोलक बेशुद्ध पडल्याचे दिसले. वाल्मीक कराड यांच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर, आता पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमा झाला आहे. त्यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे परळमीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

वाल्मीक कराड यांना न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले. कराड समर्थकांनी टॉवरवर चढत आपला रोष व्यक्त केला. परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून वाल्मीक कराड समर्थकांनी आंदोलन केले. आंदोलन करताना कराड समर्थकांनी न्याय द्या द्या... अशी घोषणाबाजी केली. वाल्मीक कराड यांच्या आईचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना दुसरीकडे समर्थक टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत.

केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. कराडला आज केज कोर्टात हजर करण्यात येत आहे. कराडला न्यायालयीन कोठडी मिळणार की जामीन मंजूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT