Walmik Karad Gopinath Munde MCOCA Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad MCOCA : मुंडेंच्या मकोकात परळीचा आका, मालकाच्या कायद्यामुळे कराडचा करेक्ट कार्यक्रम, VIDEO

Walmik Karad Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे यांनी मकोका कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुंडे यांच्या घरी कामाला असणारा वाल्मीक कराड आता मकोका कायद्यात अडकला आहे.

Yash Shirke

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Walmik Karad : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या कायद्यानंच त्यांचा घरगडी असलेल्या वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम केलाय. देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये किती आणि कसे फोन कॉल्स झाले? कराड मकोकात कसा अडकला त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

मकोका कायद्यात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड एकेकाळी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या परळीतल्या घरी कामाला होता. मात्र आपल्या मालकानं गृहमंत्री असताना राज्यातली संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणलेल्या मकोका कायद्यात एके दिवशी आपणच अडकू असा विचारही कधी वाल्मिक कराडनं केला नसेल. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींसोबत कराडचे कनेक्शन असल्याचा संशय आल्यामुळे कराडवर मकोका लावण्यात आलाय. विशेष म्हणजे या आरोपींसोबत वाल्मिक कराडचे सहा फोन कॉल्स झाल्याची माहिती पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. नेमके कुणासोबत आणि कसे वाल्मिकचे कॉल्स झाले ते पाहूयात.

कराडसोबत आरोपींचे 6 फोन कॉल्स?

पोलिसांच्या सूत्रांनुसार खुनातील आरोपी विष्णू चाटे आणि इतर आरोपींमध्ये सहा कॉल्स झाले आहेत. खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणाबाबत हे कॉल्स झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय. विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स चाटेच्या माध्यमातून कराडसोबत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाचा दिली आहे. या कॉल्समधून हत्येतील आरोपी आणि वाल्मीक कराडमध्ये संभाषण झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय. त्यामुळे हत्या प्रकरणात कराड दिवसेंदिवस पुरता अडकत चाललाय. ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मिक कराडने आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्याच मुडेंनी केलेल्या कायद्यात तो अडकला.

मुंडेंच्या कायद्यामुळे कराडचा 'करेक्ट कार्यक्रम'

1990 च्या दशकात मुंबईतल्या गँगवॉरविरोधात गोपीनाथ मुंडेंनी रान उठवलं होतं. यानंतर 1995 साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले. मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मकोका कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला. आणि २४ फेब्रुवारी १९९९ साली या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. आता याच कायद्याखाली कधीकाळी त्यांचा घरगडी असलेला वाल्मिक कराड गजाआड गेलाय. त्यात आता देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींसोबत फोनवरून संभाषण केल्याचाही कराडवर संशय आहे. त्यामुळे आपल्या मालकानं केलेल्या कायद्यामुळे वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा आता रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT