Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मीक कराड जेलमध्ये, पण बाहेर पैशाची मागणी; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, बॅनरवर मुंडे बहीण-भावाचा फोटो

Dhananjay Munde And Pankaja Munde: जेलमध्ये असलेल्या वाल्मीक कराडच्या नावाने सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून आर्थिक निधीची मागणी केली जात आहे. या बॅनरवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत.

Priya More

Summary -

  • बीडमधील वाल्मीक कराड जेलमध्ये असून त्याच्या नावाने निधी मागितला जात आहे.

  • सोशल मीडियावर वाल्मीक कराडच्या नावाने पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

  • वाल्मीक कराडच्या बॅनरवर मुंडे बहीण-भावाचे फोटो झळकले आहेत.

  • या बॅनरवर 'फोन पे' स्कॅनर लावण्यात आले आहे.

योगेश काशिद, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मीक कराड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड जेलमध्ये असताना देखील बाहेर त्याच्या नावाने पैसे मागितले जात आहे. सोशल मीडियावर वाल्मीक कराडच्या नावाने पोस्ट व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे वाल्मीक कराडच्या बॅनरवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर 'वाल्मीक अण्णाचे नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे.', 'फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी' अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

यासोबत वाल्मीक कराडच्या पोस्टसोबत 'फोन पे'चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे. जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे. संदीप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती. एवढेच नाही तर सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर याच संदीप तांदळेने वाल्मीक कराडचा फोटो झळकावला होता. आता मदत निधीचे बॅनर व्हायरल झाल्यानंतर हे बॅनर कोणी तयार केले? त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भगवान भक्ती गडाच्या ट्रस्टने केली आहे. दरम्यान याप्रकरणी अंमळनेर पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 3 बाबत महत्त्वाची अपडेट! वरळी ते कफ परेडदरम्यान मेट्रो धावणार, मुंबईकरांचा वेळ वाचणार

Maharashtra Live News Update : - १४ नोव्हेंबरला बिहारला मिळणार नवा मुख्यमंत्री, वाचा निवडणूकीचं संपूर्ण वेळापत्रक

Fast Charging Risks: फास्ट चार्जिंग वापरताय? स्मार्टफोनवर होऊ शकतात वाईट परिणाम, जाणून घ्या

Bihar Election: धुरळा उडणार! बिहारमध्ये २ टप्प्यांत निवडणूक; मतदानाच्या तारखा जाहीर, निकाल कधी?

IRCTC: मज्जाच मज्जा! भारतीय रेल्वे घडवेल फॅमिली ट्रिप; टूरिस्ट ट्रेननं करा देवदर्शन,कोण-कोणत्या स्थळांनी देणार भेट

SCROLL FOR NEXT