अंबरनाथ एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्प सुरू; वालधुनी नदी होणार रसायनमुक्त अजय दुदाणे
महाराष्ट्र

अंबरनाथ एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्प सुरू; वालधुनी नदी होणार रसायनमुक्त

आनंदनगर एमआयडीसीत असलेला रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अखेर ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुदाणे

अंबरनाथ - आनंदनगर एमआयडीसीत Ambarnath MIDC असलेला रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अखेर ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला आहे. एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया करून थेट कल्याणच्या खाडीत जाणार आहे. त्यामुळे वालधुनी नदी Waladhuni river रसायनमुक्त होणार आहे. Waladhuni river will be chemical free

हे देखील पहा -

सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकूण १२०० पेक्षाही जास्त कंपन्या आहेत. त्यापैकी १२७ बड्या रासायनिक कंपन्या आहेत. दररोज जवळपास ४ एमएलडी रासायनिक सांडपाणी या कंपन्यांमध्ये मिळून तयार होते.

मात्र या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीत प्रक्रिया केंद्र नसल्याने ते जुजबी प्रक्रिया करून वालधुनी नदीत सोडले जात होते. त्यामुळे वालधुनी नदीचा रासायनिक नाला झाल्याचे चित्र पहायला मिळाले होते . आता एका खासगी संस्थेकडून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले असून तिथे दररोज ७.५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. Waladhuni river will be chemical free

अंबरनाथ एमआयडीसीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्यामुळे कंपन्या आपला विस्तार करू शकत नव्हत्या. तर दुसरीकडे नव्याने येत असलेल्या कंपन्यांनाही परवानगी मिळत नव्हती. मात्र आता या नव्या कंपन्या अंबरनाथमध्ये येऊ शकणार आहे. त्यामुळे रोजगार, निर्यात, उद्योग, या सगळ्यात वाढ होणार आहे. सध्या वार्षिक ६ ते ८ हजार कोटींची उलाढाल अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून होते. हाच आकडा आता २० हजार कोटींवर जाणार, असा विश्वासआमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; आता क्रीडा खातं कोणाकडे? जाणून घ्या

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT