wai phulenagar bagad yatra saam tv
महाराष्ट्र

Wai Bagad Yatra : काळूबाईच्या नावानं चांगभलं, काशीनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात वाईत बगाड यात्रा उत्साहात (Video)

Wai Bagad Yatra Latest Marathi News : शिडाच्या टोकाला झोपाळ्याच्या मदतीने बगाडयास टांगण्यात आले हाेते. बैल आणि भाविकांच्या मदतीने बगाडाचा गाडा ओढण्यात आला.

ओंकार कदम

Satara :

वाई जवळ असणाऱ्या फुलेनगर येथील काळुबाई यात्रेच्या निमित्ताने निघालेली बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात व शांततेत पार पडली. काळुबाईच्या नावानं चांगभल व काशीनाथाच चांगभल या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाकेश्वर येथील नाथ म्हस्कोबा मंदिरा पासून बगाड मिरवणूकीस सुरूवात झाली. प्रशांत जमदाडे यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला. बगाडयास कृष्णानदीत आंघोळ घालण्यात आली आणि विधीवत पूजा करण्यात आली. (Maharashtra News)

बगाडयाच्या मागे देवीची पालखी ट्रक्टरमध्ये ठेवण्यात आली होती. भाविक श्रध्देने देवीचे दर्शन घेत होते. गुलालाची उधळण करीत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बगाड भद्रेश्वर रस्त्यावर आले. शेतातून आणि कच्चा पायवाटेने तीन किलोमीटर अंतर पार करीत सायंकाळी साडेसहा वाजता बगाड सुखरूपपणे काळेश्वरी मंदिराजवळ पोहचले. तेथे भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT