sangli, potholes, waghwadi grampanchayat saam tv
महाराष्ट्र

Sangli : इथं खड्डा आहे ! वाघवाडीत बुजगावणं ठरलं चर्चेचा विषय

याच मार्गावर बाजारपेठ वसली असून तालुक्यातील ग्राहकांची या ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते.

विजय पाटील

सांगली : सतत पडणारा पाऊस अन् निकृष्ट कामामुळे सांगली (sangli) जिल्ह्यातील बहुतांश गावातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे (potholes) की खड्ड्यात रस्ते अशी रस्ते मार्गाची अवस्था झाली आहे. वाळवा तालुक्यातील इस्लामपूर ते चिकुर्डे या रस्त्यावर वाघवाडी येथील मुख्य चौकातील देखील अशीच अवस्था आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी वाघवाडी येथील संतप्त युवक व ग्रामस्थांनी खड्ड्यात चक्क बुजगावणे उभं करून निषेध नाेंदविला आहे. (Sangli Latest Marathi News)

इस्लामपूर ते चिकुर्डे या मार्गावर पुणे बेंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला असलेल्या व मिनी बाजारपेठ असलेल्या वाघवाडी येथील चौकात रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. याच मार्गावर बाजारपेठ वसली असून तालुक्यातील ग्राहकांची या ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते.

त्यामुळे या मार्गावरून शालेय विद्यार्थ्यांना वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे तक्रार करून देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ व युवकांनी या खड्ड्यात चक्क बुजगावणे उभा करून प्रशासनाचा निषेध नाेंदविला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar Childhood Photos: कुरळ्या केसांचा हिरो! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे बालपणीचे हे फोटो पाहिलेत का?

Atal Pension Yojana: या कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹५००० वरुन १०,००० रुपये होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT