Sambhaji Raje Chhatrapati Saam Tv (Facebook)
महाराष्ट्र

Wagh Nakh Politics: वाघनखं खरी की खोटी? वाद सुरू असताना संभाजीराजे छत्रपतींनी सांगितला इतिहास

Wagh Nakh Politics: वाघनखं खरी की खोटी? संभाजीराजे यांनी याबाबत सोशल मीडियावरुन आपली भूमिका मांडलीय.

Bharat Jadhav

Sambhaji Raje Chhatrapati:

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेलेत. मात्र या वाघनखांवरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोपही करत आहेत. या वादादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघनखांविषयी एक महत्त्वाचं विधान केलंय. या वादावर सरकारनं सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांनी चर्चा करून एकमतानं मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. (Latest News)

संभाजीराजे यांनी याबाबत सोशल मीडियावरुन आपली भूमिका मांडलीय. लंडन येथील संग्रहालयात असणारी वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनसाठी आणले जात आहे. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानच्या वधासाठी वापरली असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केलं आहे. २०१७ साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी शक्यता असल्याचं लिहिलेले दिसले. सरकारनं या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा.

दरम्यान सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांश ऐतिहासिक मूल्य आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षाच्या मुदतीवरच आणले जात आहे. मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारनं वाघनख कायम स्वरुपी मूळ ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईच्या पाणीसाठ्यात घट

आगीचे तांडव! मुंबई, ठाण्यासह राज्यभरात २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात रॉकेटवर बंदी, नवी मुंबईत प्रदूषण वाढले

Weather Update: थंडी आली रे! अखेर राज्यात थंडीची जोरदार चाहूल; निफाडचा पारा घसरला, तुमच्या भागात काय आहे स्थिती?

Monday Horoscope : पैसा येण्याचे मार्ग मोकळे! 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

SCROLL FOR NEXT