Wada Accident News Saam tv
महाराष्ट्र

Wada Accident News: मातीने भरलेल्या डंपरने बाप लेकाला चिरडले; केळठण- गोराड रस्त्यावर झाला अपघात

Wada News : मुंबई- अहमदाबाद द्रुतगती महामार्गाचा माती भरावाचे काम सुरू आहे. यासाठी डंपर माती घेण्यासाठी येतात. मुलगा साहिल यास केस कापण्यासाठी केळठणला मोटरसायकलने घेऊन जात होते

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

वाडा : मुलाला केस कापण्यासाठी मोटारसायकलवर जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (Wada) दुचाकीला धडक दिली. यात दोन्ही रस्त्यावर फेकले गेले. यानंतर त्यांच्या अंगावरून मातीने भरलेले (Accident) डंपर गेल्याने ९ वर्षीय मुलासह पित्याचा देखील मृत्यू झाला आहे. (Breaking Marathi News)

मुंबई- अहमदाबाद द्रुतगती महामार्गाचा माती भरावाचे काम सुरू आहे. यासाठी डंपर माती घेण्यासाठी येतात. अशाच एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंप्परने मुलगा साहिल वड (वय ९) व वडील सचिन वड या दोघा बापलेकाला चिरडले. मुलगा साहिल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर वडील सचिन याला ठाणे (Thane) येथे उपचारासाठी घेऊन जात आसताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे महामार्गावर काम करणाऱ्या डंप्पर ने माती वाहतूक करणाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केस कापण्यासाठी जाताना झाला घात  

वाडा तालुक्यातील केळठण - गोराड रस्त्यावर हा अपघात झाला आहे. दरम्यान मुलगा साहिल यास केस कापण्यासाठी केळठणला मोटरसायकलने घेऊन जात होते. याच दरम्यान डंपरने धडक दिल्याने सदर अपघात झाला.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT