sangli , vita, sangli crime news saam tv
महाराष्ट्र

Crime News : म्हसवड, वडूज, कराड, विटा, खानापूर, सांगलीतून बाईक चाेरी करणारी टाेळी गजाआड

अधिक तपास विटा पोलीस करीत आहेत.

विजय पाटील

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या (sangli) विटा (Vita) पोलिसांनी (Police) धडाकेबाज अशी कामगिरी सुरु केली आहे. पाेलिसांनी मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीचा आज पुन्हा पर्दाफाश केला आहे. या टाेळीकडून सात लाख 45 हजार किमतीच्या नऊ माेटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. (Sangli Crime News)

खानापूर येथील शब्बीर तांबोळी यांनी घराच्या पोर्च मधून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार विटा पोलिसांत दाख केली होती. त्यानुसार तपास करत असताना राहुल जाधव आणि विशाल पाटील यांनी दुचाकी चोरी केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. विटा बस स्थानक परिसरात हे दोघे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी बस स्थानकातून त्यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता अमृत काळोखे आणि महेश वीर यांच्या साथीने विटा, म्हसवड, वडूज, खानापूर, कराड, सांगली येथून दुचाकी चोरल्याचे कबूली त्यांनी दिली. अधिक तपास विटा पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Organ donation: दरवर्षी 4-5 लाखांना अवयव प्रत्यारोपणाची गरज; 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना लाभ, रुग्णालयाचा जनजागृतीसाठी पुढाकार

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Maharashtra News Live Update: पंढरपूर- नीरेच्या पाण्यासाठी सांगोल्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

कोल्हापुरात मन हेलावणारी घटना, २ चिमुकल्यांचा जीव घेतला, त्यानंतर आईनेही आयुष्य संपवलं

Shocking : बारामती हादरली! आई आणि मुलाने संपवलं आयुष्य, पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला अन्...

SCROLL FOR NEXT