Virar Crime News: Saam Tv
महाराष्ट्र

Virar Crime News: विरार हादरलं! ७५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या, परिसरात खळबळ

विरारधील उसगाव येथे दगडाने ठेचून वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चेतन इंगळे

virar News: विरारमधून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे.विरारधील उसगाव येथे दगडाने ठेचून वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार मांडवी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील उसगावात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उसगाव येथील देसाई वाडी बस स्टॉप जवळ गुरुवारी सकाळी मृतदेह आढळला. सदर व्यक्तीचे नाव भिवा भिखा वायडा असे आहे. या वृद्धाचे वय ७५ असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी भाताणे येथे पाठविण्यात आला. सदर व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.

नेमकं काय घडलं?

विरारच्या उसगाव येथील भिवा हे घरी काजूपाडा येथे जात असल्याचे सांगून बुधवारी सांधकाळी निघून गेले होते. रात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली. सकाळी त्यांचा मुलगा शोध घेत असताना उसगाव येथे मृतदेह आढळला. या घटनेनेने परिसरात घबराहाट पसरली आहे. याबाबत मांडवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नदीकाठी आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह गोदावरी नदी काठावर आढळून आला.

मुगट गावातील नदीकाठी प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विकास धोंडिबा तुपेकर (वय २२ वर्ष) आणि ऋतुजा बालाजी गजले (वय १८ वर्ष) असं मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलनं इग्लंडला दमवलं, झळकावलं द्विशतक

Accident News: कार ६० फूट खोल ओढ्यात कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना, पाहा,VIDEO

Sharad Pawar : खडकवासला धरण, कात्रज बोगदा ते तथाकथित पुणेकरांनी दिलेला त्रास; शरद पवार महात्मा फुलेंवर काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT