VIRAL VIDEO Saam Digital
महाराष्ट्र

VIRAL VIDEO: डॉक्टर तरुणीला सॅल्यूट!प्रवाशाला हॉर्ट अटॅक, ५ मिनिटांत मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर आज एका ६० वर्षांच्या वृद्धाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र एका डॉक्टर तरुणीने त्यांना वेळीच सीपीआर देऊन जीवदान दिलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायलर होत आहे.

Sandeep Gawade

मोबाईल आणि इंटरनेटच्या या जमान्यात संकटात सापडलेल्यांचा व्हिडिओ काढण्यापलिकडे काही केलं जात नाही. त्यामुळे योग्यवेळी मदत न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याला दिल्लीतील एक डॉक्टर अपवाद ठरली आहे. आज दिल्ली विमानतळावर तिने दावलेलं प्रसंगावधान आणि योग्य वेळी केलेली मदत, यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिने एका ६० वर्षांच्या वृद्धाला मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणलं आहे.

तर झालं असं की, दिल्ली विमानतळावरील क्रमांक २ टर्मिनलवर एक ६० वर्षांचा वृद्ध अचानक हृदयविकाराचा झटका झटका येऊन जागीच कोसळला. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. आजूबाजूला लोक जमले पण कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हतं. अखेर या गर्दीतून एक महिला समोर आली. ही अशी वेळ होती की वृद्धाला वाचवणं जवळपास अशक्यच होतं, कारण त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यात उतारवय आणि शरीराची हालचालही नाही.

गर्दीतून मदतीसाठी धावून आलेली महिला डॉक्टर होती. तिने लगेच सीपीआर दिला. तब्बल ५ मिनिटे तिने आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. वृद्धाने डोळे उघडले. अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून तिने या वृद्धाला सोडवून आणलं आहे. एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि ५ मिनिटांच्या अथक प्रयत्नातून एका ६० वर्षांच्या वृद्धाला जीवदान मिळालं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT