amaravati News  Saam tv
महाराष्ट्र

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Fact Check News : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावतीत छत्री तलावाजवळ भूताने युवकाला मारल्याचा दावा व्हायरल व्हिडिओतून केला जात आहे. भूताच्या अफवेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या व्हायरल व्हिडिओवर पोलिसांनी विश्वास ठेवू नका, असे पोलिसांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात छत्री तलाव परिसरातील कथित भूताचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही युवक मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्रीच्या वेळी छत्री तलावाजवळ गेले. या निसर्गरम्म वातावरणात अचानक एका स्त्री भूताचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. भूताला पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला स्त्री भूताचा अवतार एका काळ्या कपड्यांमध्ये दिसल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दावा केला आहे?

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भूताचा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये संपूर्ण अंधार असून त्यामध्ये फक्त एका स्त्री भूताचा रडण्याचा आवाज ऐकू येतोय. या व्हायरल फोटो आणि व्हिडिओमुळे परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. सायबर पोलिसांकडून व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओचा तपास केला जात आहे. नागरिकांनी या व्हायरल झालेल्या फोटो व्हिडिओवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या निफाड तालुक्यातही भूताची अफवा पसरली होती. निफाडमधील काही भागात भूत दिसल्याचा दावा काहींनी केला होता. निफाडच्या शिरवाडे ते धामोरी गावच्या रस्त्यावर नदीजवळ एका वाहनचालकाने भूत दिसल्याचा दावा केला होता. मात्र, काही दिवसांनी भूताचा दावा खोटा ठरला. त्याच प्रकारे आता अमरावतीतही भूताची अफवा पसरली आहे. भूताचे तेच व्हिडिओच सोशल मीडियावर पसरले आहेत. त्यामुळे अमरावतीत भूत असल्याचा दावा खोटा ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT