Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video : तापलेल्या तव्यानंतर पाण्यावर तरंगणारा बाबा व्हायरल; दर्शनासाठी अख्ख गाव जमलं

बाबांनी विहिरीमध्ये पद्मासन करताच गावकरी हे पाहून चकित झाले आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video : काही दिवसांपूर्वीच गरम तव्यावर बसलेला बाबा जोरदार व्हायरल झाला. या बाबाची चर्चा कमी होत नाही तोच सोशल मीडियावर आता पाण्यावर तरंगणारा बाबा व्हायरल होत आहे. हे बाबा आपल्या हातापायांची हलचाल न करता पाण्यावर तरंगत आहेत. पाण्यावर तरंगतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. (Viral Baba)

बाबांच्या दर्शनाला आखं गाव जमलं

बाबांचा पाण्यावर तरंगतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या बाबांना पाहून सगळेच चकित झालेत. गावामध्ये असलेल्या एका विहिरीत बाबा मांडी घासून खाली झोपलेल्या अवस्थेत तरंगताना दिसले आहेत. गावात या बाबांची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील धोतरा येथे सध्या भागवत सप्ताह सुरू आहे. येथील भागवताचार्य हरिभाऊ राठोड हे सध्या भागवत करत आहेत. त्यांनी आपल्या भागवतामध्ये मी पाण्यावर कोणताही आधार न घेता राहू शकतो असा दावा केला होता. त्यावर त्यांनी या गावात असलेल्या जाधवांच्या विहिरीत तरंगुन दाखवले आहे.

चमत्कार की योगा?

बाबांनी विहिरीमध्ये पद्मासन करताच गावकरी हे पाहून चकित झाले आहेत. अर्ध्या तासाहून अधिक वेळ बाबा पाण्यावर तरंगुन राहिले होते. ही कोणतीही दैवीशक्ती किंवा थोतांड नसून हा योगाचा एक प्रकार आहे. सदर बाबांच्या वडीलांपासून त्यांच्याकडे ही कला आहे. त्यामुळे ते देखील असा प्रयोग करू शकत आहेत, गावातील एका व्यक्तीने बाबांविषयी ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT