vinayak raut will defeat narayan rane in lok sabha election 2024 says rajan salvi  saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : नारायण राणे राजन साळवींचे चॅलेंज स्विकारतील ? (पाहा व्हिडिओ)

राज्यसभेला यंदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी मिळालेली नाही. ते पुन्हा लाेकसभा निवडणुक लढवतील असा अंदाज बांधला जात आहे.

अमोल कलये

Konkan Politics : 

नारायण राणे (narayan rane) हे लोकसभेसाठी (lok sabha election 2024) उमेदवार असतील तर आमचा विजय नक्की आहे. चांगल्या फरकांनी आम्ही विजयी होणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) शिवसैनिक आमदार राजन साळवी (mla rajan salvi) यांनी रत्नागिरी (ratnagiri) येथे साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आडाखे बांधू लागले आहेत. गावागावांत पक्ष त्यांच्या माध्यमातून झालेली कामे लाेकांपर्यंत पाेहचवत आहेत. काेकणात देखील राजकीय वातारवण ढवळून निघाले आहे.

राज्यसभेला यंदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी मिळालेली नाही. ते पुन्हा लाेकसभा निवडणुक लढवतील असा अंदाज बांधला जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत (lok sabha election 2024) नारायण राणे (narayan rane) किंवा आणखी काेणीही असाे असू दे आमचाच विजय हाेणार असे आमदार राजन साळवींनी साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी नमूद केले.

आमदार राजन साळवी म्हणाले काेकण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुक नवी नाही. नारायण राणे यांना शिवसेनेनी मोठं केलं. गत निवडणुकीत राणे हे एका तरुण तडफदार युवकाकडून काेकणात तसेच मुंबईत महिलेकडून पराभूत झाले. (Maharashtra News)

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत (vinayak raut) पुन्हा एकदा विजयी हाेतील. ते हॅट्रिक करतील असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT