raj thackeray and vinayak raut saam tv
महाराष्ट्र

गरज लागेल त्यांना पक्ष भाड्याने मिळताे; राऊतांनी उडवली 'मनसे' ची खिल्ली

महाविकास आघाडी सरकार भक्कम राहील त्यास काेणाचाही धाेका नाही असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : नकला करून पक्ष चालत नसतो असा टोला शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी मनसेचे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांना येथे (sindhudurg) लगावला आहे. औरंगाबाद (aurangabad) येथे रविवारी झालेली राज ठाकरे यांची सभा आपण पाहिली देखील नाही. त्याची गरज देखील वाटली नाही असेही राऊत यांनी नमूद केले. (raj thackeray latest marathi news)

राऊत म्हणाले उद्धव ठाकरे (uddhav thackeray) स्वतःच्या मेहनतीने महाराष्ट्राचा कारभार पाहताहेत. ती मेहनत अशा नकलाकारांना जमणार नाही. नकलेने फक्त करमणूक होत आहे. हे त्यांनी समूजन घेतले पाहिजे असा टाेला राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला.

मनसे हा पक्ष भाडयावर ठेवला असून ज्यांना गरज लागेल त्यांना तो भाड्याने देण्यात येतो अशी टिप्पणी राऊत यांनी केली. त्यामुळे अशांची वक्तव्ये व सभेची दखल घेण्याची गरज वाटत नाही. असे किती आले आणि गेले. शिवसेना (Shivsena) भक्कम आहे. महाविकास आघाडी सरकार (mva) भक्कम राहील त्यास काेणाचाही धाेका नाही असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT