vinayak mete accident case, ncp saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case : विनायक मेटेंच्या अपघाताची चाैकशी एसआयटीकडून व्हावी : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असू शकतं हे समजलं पाहिजे असे शेख यांनी नमूद केले.

विनोद जिरे

Vinayak Mete Accident Case : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाताची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे. ही मागणी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी बीड येथे केली आहे. शेख यांनी जनतेसमाेर सत्य आलं पाहिजे असं माध्यमांशी बाेलताना नमूद केेले. (Beed Latest Marathi News)

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा घात की अपघात? असा संशय कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी येथे केली.

दरम्यान मेटे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक गजानन खमीतकर यांनी समाज माध्यमातून एक पाेस्ट केली हाेती. ती याेग्य नसल्याचं कारण देत खमीतकर यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे असेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT