स्मशानभूमीच्या मागणीसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून ग्रामस्थांचे आंदोलन  भारत नागणे
महाराष्ट्र

स्मशानभूमीच्या मागणीसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून ग्रामस्थांचे आंदोलन

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यावर रास्तारोको केला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : गावामध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यावर रास्तारोको करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. Villagers agitation for demand of cremation

हे देखील पहा -

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वर्षानुवर्षे मागणी करुन देखील येथे कायमीस्वरुपी स्माशनभूमीसाठी जागा मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

आज विठ्ठलवाडीतील एका वृध्द महिलेचे निधन झाले. अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी चक्क मृतदेहाला रस्त्यावर बसवून रस्त्यावर बसवून आंदोलन सुरु केले आहे. सुमारे दोन तासापासून मृतदेह रस्त्यावर ठेवून ग्रामस्थांचे आंदोलन सुरु आहे.

आंदोलनामुळे पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर येथील ग्रामस्थांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. प्रसंगी रस्त्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करु असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून स्मशानभूमीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT