Samruddhi Mahamarg Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वरुन राजकारण सुस्साट; महामार्गावरील वाहतूक थांबवावी, विजय वडेट्टीवारांची मोठी मागणी

Vijay Wadettiwar Samruddhi Mahamarg Accident: अपघाताची मालिका रोखण्यासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

Ruchika Jadhav

Vijay Wadettiwar:

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरूच आहे. दर महिन्यात येथून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. अपघाताची ही मालिका रोखण्यासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. (Latest Marathi News)

"समृद्धीचे काम अर्धवट असताना एन्ड टू एन्ड सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही, समृद्धीत भ्रष्टाचारानेच झाला हे कोणी नाकारू शकत नाही. महामार्गाचे काम घाई गडबडीत करण्यात आले आहे. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहे. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहेत. यात तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे समृद्धीची वाहतूक थांबवावी, समृद्धी सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे. ", अशी मागणी वडेट्टीवारांनी केलीये.

शापित महामार्ग

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील महामार्गावरून टीकास्त्र सोडलंय. मुळात संपूर्ण महमार्ग चुकीच्या पद्धतीने निर्माण करण्यात आलाय. जनतेच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचं हित आणि कोट्यावधींचा मलीदा या पलिकडे सरकराने समृद्धी महामार्गाकडे पाहिलेलं नाही. शेतकरी, लहान उद्योजकांचे हित देखील पाहिले नाही. जमिनी ओरबाडून घेतल्या. त्यामुळे त्या सर्व व्यक्तींचे हे श्राप आहेत. महामार्ग घाईने पूर्ण करून त्याचं क्रेडीट तुम्ही घेतलं, तर आता होणाऱ्या अपघातांची जबाबदारी देखील सरकारने घेतली पाहिजे.

वेगमर्यादेचा विचार केला पाहिजे

समृद्धी महामार्गावर शनिवारी झालेल्या अपघावर मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय की, "Msrdc कडून अपघाताचा आढावा घेतला जातोय. यावर तोडगा काढला जाईल. आरोग्य सुविधांचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. वेगमर्यदेचा विचार केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT