Vijay Vadettiwar on Sambhaji Bhide Saam Tv News
महाराष्ट्र

Vijay Vadettiwar : काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सूचली; भिडेंचे लचके तोडल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची उपरोधिक टीका

Vijay Vadettiwar on Sambhaji Bhide Guruji : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भिडे गुरुजींवर उपरोधिक टीका केलीय.

Prashant Patil

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत संभाजी भिडे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर संभाजी भिडेंना डॉक्टरांकडून दोन इंजेक्शन देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. आता या प्रकारानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंवर उपरोधिक टीका केली आहे. तसेच इतर नेत्यांनी देखील टोला लगावला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली. कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. पोलीस नक्की कुत्रा शोधत आहेत, याची अजून माहिती मिळालेली नाही. मी माहिती घेतो. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का असा राग धरला यासंदर्भात SIT लावून चौकशी केली पाहिजे', असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला

'कुत्रा कुणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला चावावेत अशी आपण देवाकडे प्रार्थना करुया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या माणसाला चावला तरच सापडतो. या सरकारची कार्य करण्याची पद्धत योग्य आहे', असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

नेमकं प्रकरण काय?

संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. काल रात्री उशिरा कार्यक्रम संपवून घरी जात असताना भिडे गुरुजींवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला. यावेळी त्या कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी ही घटना घडली. यानंतर जखमी झालेल्या भिडे गुरूजींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT