Ambadas Danve, Eknath Shinde And Devendra fadnavis
Ambadas Danve, Eknath Shinde And Devendra fadnavis  saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना, खासदारांना खूष करतात, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

संतोष जोशी

नांदेड : राज्यात एकनाथ शिंदे गटाने बंडाचं निशाण फडकावून भाजपच्या मदतीने सत्तांतर केलं. त्यानंतर स्थापन झालेल्या नवनिर्वाचीत शिंदे-फडणवीस सरकारवर (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतर दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केलीय. नांदेडच्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना, खासदारांना खूष करण्याचं काम करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत काहीही घेणं देणं नाही, असं म्हणत दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले, बंडखोर,गद्दार आमदार आणि खासदारांना खूष करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. शिंदे यांनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पंरतु, शिंदे त्या ठिकाणी आले नाहीत.

नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज होती, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. आगामी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवू आणि त्यांना मदत मिळवून देऊ, असंही अश्वासन दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case: अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणी दोघांना अटक, आप-काँग्रेसशी कनेक्शन आलं समोर

Dhananjay Mahadik | धनंजय महाडिक यांची कुणावर टीका?

Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये का पाठवले? आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंच्या टीकेवर हल्लाबाेल, Video

KL Rahul Record: केएल राहुलला नंबर १ बनण्याची संधी! अवघ्या ३५ धावा करताच रचणार इतिहास

Buldana News | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT