MVA leaders 
महाराष्ट्र

MLC Election : मविआचा फॉर्म्युला ठरला! ठाण्याची जागा शरद पवारांना, पाहा काँग्रेस अन् ठाकरेंना कोणत्या जागा?

MVA seat sharing : महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर एकमत साधले असून काँग्रेस सर्वाधिक ८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. नाशिक आणि नांदेडच्या जागांवर मात्र अद्याप तिढा कायम आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Legislative Council polls, MVA latest news : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्मुला आज अखेर ठरलाय. १५ जागांवर एकमत झाल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. दरम्यान, विधान परिषदेला सर्वाधिक जागा काँग्रेस लढणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. मविआच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ५ लाखांमध्ये नगरसेवकांचे मत विकत घेतले जात असल्याचा खळबळजनक आरोप, यावेळी त्यांनी केला. भाजप घोडेबाजार करत आहे, ती आपल्याला थांबवावी लागेल, आपल्याला विचारासाठी लढावे लागले. संघर्षासाठी मविआ तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलेय.

विधान परिषदेच्या जागावाटपासाठी मविआच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत झाले आहे. काँग्रेस सर्वाधिक ८ जागा लढणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना ४ तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर मैदानात उतरणार आहे. पुणे, सातारा, सांगली या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर अद्याप तिढा कायम असून काही दिवसात यावर तोडगा निघेल असे सपकाळ म्हणाले. नांदेड आणि नाशिक या २ जागा लढण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत, यावर चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल.

नाशिक-नांदेडवर चर्चा -

काँग्रेस (८ जागा)

वर्धा-चंद्रपूर-गोंदिया

यवतमाळ

भंडारा-गोंदिया

अहिल्यानगर

अमरावती

सोलापूर

धाराशिव-बीड-लातूर

नागपूर

ठाकरेंची सेना -

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग

परभणी-हिंगोली

जळगाव

संभाजीनगर-जालना

शरद पवारांची राष्ट्रवादी

पुणे

ठाणे

सातारा-सांगली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT