Legislative Assembly Elections saam
महाराष्ट्र

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर

राज्यात येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेचे मतदान आहे. यासाठी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रत्येक पक्षात धडपड सुरू आहे. मात्र यात चर्चा रंगलीय ती ५ : २५ या आकड्याची. प्रत्येक निवडणुकीत काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे म्हणणारे शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा ५ : २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळेल, अशी उत्सुकता दिसून येत आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १४ अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील २ अर्ज आज बाद झाले. त्यामुळे या निवडणुकीत आता ११ जागांसाठी १२ उमेदवार आहे . यात ९ उमेदवार हे महायुतीचे आहेत, तर ३ उमेदवार महाविकास आघाडी चे आहेत. महायुतीकडे ८ उमेदवार निवडून येतील इतके संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे त्यांचे ३ उमेदवार जिंकतील इतका संख्याबळ आहे.

मात्र महायुतीच्या एका उमेदवाराच्या विजयाचा प्रश्न येत असल्याने उद्धव ठाकरे गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले. याबाबत चर्चा होताच शिंदे गटाचे २५ आमदार आमच्या संपर्कांत आहे, असे जाहीरपणे ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी सांगितले. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयाचे गणित जमवताना सध्या ५ : २५ च्या आकड्याची चर्चा होताना दिसतेय.

येत्या १२ जुलै ला विधान परिषद निवडणूक आहे. त्या आधी ५ जुलै ला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे . त्यामुळे ५ जुलै ला जर कोणी अर्ज मागे घेतला नाही तर ११ जागांसाठीची १२ उमेदवारांची लढत रंगतदार होणार. त्यामुळे महायुतीच्या एका उमेदवारासाठी पुन्हा २०२२ प्रमाणे क्रॉस वोटिंग होईल की ५ : २५ ची आकडेवारी खरी ठरून राजकारणात पुन्हा वळण येईल हे पाहणे महत्वाचे राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेआधी शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार? ठाकरेंची ताकद वाढणार!

Marathi News Live Updates : राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा! भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

Phullwanti Movie: 'हिंदवी स्वराज्य माझ्या राज्याचं होतं, त्यांच्या दरबारात आया-बहिणांना मान, सन्मान दिला जायचा पण आता...' फुलवंतीचा ट्रेलर रिलीज

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT