Shivsena-Congress Saam TV
महाराष्ट्र

Election 2023: नाशिकनंतर नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीत ट्विस्ट; मविआच्या बैठकीनंतर मोठ्या निर्णयाची शक्यता

शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश इटकेलवार आज अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरुन तांबे कुंटुबियांना घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक पार पडली. बैठकीत नागपूरची जागा काँग्रेसला सोडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश इटकेलवार आज अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना समर्थन देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी १२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज पिंगळे यांचे आमरण उपोषण सुरू

Blood Sugar : रोज कॉफी सेवन केल्याने शुगरवर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

SCROLL FOR NEXT