Amol Kolhe Video Virl Saam Tv
महाराष्ट्र

FACT CHECK: साम टीव्हीच्या नावाने खोटा व्हिडिओ व्हायरल; अमोल कोल्हेंच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय?

Amol Kolhe Viral Video: अमोल कोल्हेंसंदर्भात साम टीव्हीच्या नावानं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. साम टीव्हीच्या नावानं हा खोटा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

अमोल कोल्हेंसंदर्भात साम टीव्हीच्या नावानं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोल्हेंनी कांदा प्रश्नी केलेलं वक्तव्य हे जरांगेंना उद्देशुन केलेलं वक्तव्य या व्हिडिओमध्ये दिसतंय. साम टीव्हीच्या नावानं एक खोटा व्हिडिओ (Amol Kolhe Viral Video) व्हायरल होत आहे. साम टीव्हीच्या नावाने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, हा व्हिडिओ पुर्णपणे खोटा आहे. साम टीव्हीच्या नावाचा वापर करून अमोल कोल्हेंबाबत जनतेची दिशाभूल केली जात आहे.

साम टीव्हीच्या खऱ्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे कांदा प्रश्नावर बोलत होते, मनोज जरांगेंवर नाही. तर खोट्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे जरांगेवर ईडी लावण्याची मागणी करत असताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. परंतु साम टीव्हीचा या व्हायरल व्हिडिओशी कोणताही संबंध (FACT CHECK) नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन साम टीव्हीकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

साम टीव्हीच्या नावाखाली अमोल कोल्हेंचा खोटा आणि चुकीचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे साम टीव्ही या व्हिडिओवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत आहे. अमोल कोल्हेंबाबत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओच्या माध्यमामधून साम टीव्हीच्या (Saam Tv) प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलं असल्याचं, साम टीव्हीच्या फॅक्ट चेक पडताळणीमध्ये समोर आलं आहे. चुकीची माहिती पसरवण्याच्या हेतुने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं दिसत आहे. वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

'साम टीव्ही'चा व्हिडिओ असल्याचा दावा करत एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिशाभूल (Amol Kolhe News) करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं साम टीव्हीच्या फॅक्ट चेक पडताळणीत समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये ग्राफिक्स आणि'साम टीव्ही'च्या लोगोचा वापर करण्यात आलाय. हे साफ चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ फेसबुकवर दिसला, तर त्याला त्वरित रिपोर्ट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT