Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video: चहा विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, चक्क शौचालयात धुतल्या कपबश्या; जळगावमधील घटनेचा VIDEO व्हायरल

Tanvi Pol

Jalgaon Viral Video: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जिथे जळगावच्या महापालिकेमध्ये प्रसाधन तसेच शौचालय गृहातील बेसिंगमध्ये चहाचे कप धुतले जात असले जात असल्याचे आढळून आले आहे. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत आहे.

प्रकरणं तरी काय?

जळगाव जिल्ह्यातील अनेक घटनांचे व्हिडिओ(Shocking) कायम व्हायरल होत असतात. त्यातच सध्या जळगावच्या महापालिकमधील घाण पाण्यात कपबशा धुतल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिथे प्रसाधनगृहामध्ये शौचालय सुद्धा असून या ठिकाणी असलेल्या बेसिंग मध्ये शिपाई कडून कप धुतले जात आहे. धक्कादायक(Shocking) बाब म्हणजे हेच कप आयुक्ताच्या दालनात कार्यालयातील मान्यवरांसाठी वापरण्यात येत असतात.

सध्या सर्व व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद करुन सोशल मीडियावरव्हायरल केलेला आहे. दरम्यान महापालिकेतील या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही गटारीच्या पाण्याने पालेभाज्या धुतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. शिवाय असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली; दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणार थेट सामना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उद्या हरियाणा दौऱ्यावर

Shyam Manav: श्याम मानव यांच्या व्याख्यानात राडा; कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांचा गोंधळ, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: आचारसंहिता लागू झाल्यावर निधी दिला का? आम्ही तपास करू; लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचं मोठं वक्तव्य

Raigad : रायगड मधील 'या' थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

SCROLL FOR NEXT