Vegetable Rate Hike Saam Tv
महाराष्ट्र

Vegetable Rate Hike: वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले

Vegetable Price Hike Today: पावसामुळे शेतीच्या पिकांचे खूप जास्त नुकसान झाले आहे. पावसामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांनाही फटका बसला आहे. बाजारातील भाज्यांचे दर खूप वाढले आहेत.

Siddhi Hande

मान्सून पावसामुळे शेती पिकांबरोरच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे .त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या लग्न सराई, वाढदिवस आणि इतर कार्यक्रमामुळे वांगी, टोमॅटो, गवार, बटाट्याला मोठी मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी अधिक त्यामुळे बाजारात वांग्यचा भाव तर आवाक्या बाहेर गेला आहे.

पंढरपूरच्या स्थानिक बाजारात एक किलो वांग्यचा भाव‌ 150 ते 180 रूपये इतका झाला आहे. तो चिकन पेक्षा महाग आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणाच्या भाजीतून वांग कमी झालं आहे. पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे.

दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्याने बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली.

भाज्यांचे किरकोळ बाजारातील किलोचे दर

गवार १२० ते १३०

शेवगा १०० ते १२०

मटार १२० ते १६०

दोडका १०० ते १२०

भेंडी १०० ते १२०

शिमला मिरची १०० ते १२०

मेथीची जुडी ७० रुपयांना

पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. परिणामी आवक घटत असते. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळेच पालेभाज्यांचे भाव वाढले आहे. किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीची ६० ते ७० रुपयांना विक्री करण्यात आली आतापर्यंतचा हा उच्चांकी दर मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT