Vasai Crime News Saam tv
महाराष्ट्र

Vasai Crime News : कब्रस्तानात जाऊन चोरट्यांनी चोरले २६ नळ

Vasai News कब्रस्तानात जाऊन चोरट्यांनी चोरले २६ नळ

चेतन इंगळे

वसई : वसईमध्ये भुरट्या चोरांनी रस्त्यावरील झाकणे, महावितरणाचे डीपी बॉक्स पाठोपाठ आता स्मशानभूमीलाही लक्ष्य केले आहे. (Vasai) वसईतील जुन्या कब्रस्तानमधील २६ नळ चोरट्यांनी लंपास केले आहे. याप्रकरणी वसई पोलीस (Police) ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

गंभीर गुन्ह्यांबरोबर भुरट्या चोरांनी वसई शहरात उच्छाद मांडला आहे. महापालिका रस्त्यावरील गटारांना लावत असलेली झाकणे चोरण्यात येत आहेत. एवढंच नव्हे तर महावितरणाचे डिपी बॉक्स देखील चोरून नेले जात आहे. आता या चोरांची नजर स्मशानभूमीवर पडली आहे. वसईत जामा मशिद ट्रस्टची कब्रस्तान (दफनभूमी) आहे. या कब्रस्तानमध्ये हातपाय धुण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नळ लावले आहेत. चोरट्यांनी या कब्रस्तानमध्ये प्रवेश करून २६ नळ काढून नेले आहेत. याबाबत कब्रस्तानची देखरेख करणारे शहाब शेख यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या परिसरात भुरटे चोर, मद्यपी आणि नशेबाजांचा वावर असतो. कब्रस्तानच्या प्रवेशद्वाला कुलुप असते. परंतु चोरट्यांनी मागील बाजूने भींतीवरून प्रवेश करून ही चोरी केली असावी असे शेख यांनी सांगितले. यापूर्वी चोरांनी कोरोना काळात पालिकेने तयार केलेल्या हॅण्डवॉश सेंटरमधील नळ देखील चोरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT