Man kills woman Saam tv
महाराष्ट्र

CCTV : ...तर तिचा जीव वाचला असता; भर रस्त्यात तरुणीची हत्या होत असतानाचा VIDEO बघा, तळपायाची आग मस्तकात जाईल!

Man kills woman in vasai : वसईत एका तरुणाने एका तरुणीची भरदिवसा हत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुण या तरुणीची हत्या करताना काही फक्त पाहत होते. या घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

वसई : वसईतून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रियकराने लोखंडी पान्याने मारून प्रेयसीची हत्या केली. प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला होत असताना लोक फक्त बघतच राहिली. या भयंकर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, वसईत प्रियकराने प्रेयसीचा भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित यादव असे आहे.

नेमकं काय घडलं?

आरती यादव आणि रोहित यादव गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रागाच्या भरात या प्रियकराने भररस्त्यात लोखंडी पाना मारण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करताना घटनास्थळी एकच गर्दी झाली.

एका व्यक्तीने या प्रियकराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती या संतापलेल्या प्रियकराला रोखू शकला नाही. या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला सुरुच ठेवला. या हल्ल्यात या तरुणीचा मृत्यू झाला आहे. यावेळी रस्त्यावरील लोकही प्रियकराकडे फक्त पाहत राहिले. हत्या करताना घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या तरुणीला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना - सुषमा अंधारे

सुषमा अंधारे म्हणाल्या की, वसईमध्ये भररस्त्यात एका तरुणीची हत्या झाली असून काळजाची थरकाप उडवणारी ही घटना आहे. दिवसाढवळ्या तरुणीची ही हत्या झाली आहे. तरुणीच्या हत्येवेळी लोक बघत होते, हे सर्व चित्र विदारक आहे. मुंबई शहराजवळ घटना घडते. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानीजवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT