Vardha Abortion Case: जमिनीत पुरलेल्या भ्रुणासह पाच कवट्या जप्त - Saam TV
महाराष्ट्र

Vardha Abortion Case: जमिनीत पुरलेल्या भ्रुणासह पाच कवट्या जप्त

आर्वी शहरात अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात डॉक्टर रेखा कदम यांच्या रूग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले दरम्यान जमिनीत पुरलेल्या भ्रूणाच्या अवशेषासह चार ते पाच कवट्या आणि रक्ताने माखलेले कपडे तसेच एक गर्भपिशवी आढळून आली आहे

सुरेंद्र रामटेके

वर्धा : आर्वी शहरात अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात डॉक्टर रेखा कदम यांच्या रूग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले दरम्यान जमिनीत पुरलेल्या भ्रूणाच्या अवशेषासह चार ते पाच कवट्या आणि रक्ताने माखलेले कपडे तसेच एक गर्भपिशवी आढळून आली आहे. (Vardha Illegal Abortion case update news)

स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉक्टर रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा तीस हजारात गर्भपात (Illegal Abortion) केल्याचे उघड झाले होते. पोलीसांनी (Police) डॉक्टर रेखा कदमसह संबंधित मुलाच्या आई वडिलांना अटक केली होती. गर्भपात प्रकरणात काही भ्रूण अवशेष जप्त केले आहेत. ते डीएनए टेस्ट साठी पाठविण्यात येणार आहेत.

डॉक्टर रेखा कदम यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आला होती. त्या दरम्यान गर्भपात करण्यात आलेला भ्रूण जप्त करण्यासाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह पालिका पथकाला पाचारण करून डॉक्टर रेखा कदम यांच्या रूग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले. सुमारे तीन ते चार तास खोदकाम सुरू होते या सर्वांचे पोलिसांनी चित्रीकरण केले तसेच कदम हॉस्पिटल मधून सर्व रेकॉर्ड पोलिसांनी जप्त करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या मागील भागात बायोगॅस प्रकल्पाचा खड्डा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्ड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पोलिसांनी पंचासमक्ष अनेक गोष्टी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्ट साठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच हाडाचे अवशेष जनावराचे की माणसाचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल.

दरम्यान, डॉक्टर रेखा कदम यांचा दोन दिवसाचा पीसीआर संपल्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशेष सेल आर्वी ज्योत्स्ना गिरी यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT