keshav kolte will perform mahapooja of vitthal rukmini  
महाराष्ट्र

विठ्ठल - रुक्‍मिणीच्या महापूजेचा मान वर्ध्यातील दाम्पत्यास

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा वर्ध्यातील वारकऱ्याला मिळाला आहे. ७१ वर्षीय केशव शिवदास कोलते keshav kolte will perform mahapooja of vitthal rukmini हे येत्या 20 जूलैला सपत्नीक पूजा करतील. गेल्या २० वर्षापासून कोलते हे मंदिरात वीणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. (vardha-couple-will-perform-vitthal-rukmini-pooja-along-with-uddhav-thackreay-pandharpur)

काेविड 19 चा प्रार्दुभाव लक्षात घेता घेऊन यंदा शासनाने पायी वारीवर बंदी घातली आहे. याबराेबरच आषाढी एकादशी दिवशीही श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. यंदा देखील वीणेकरी यांना महापूजा करण्याचा मान देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. चिठ्ठीच्या माध्मयातून केशव काेलते यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत पत्नी इंदबाई या असणार आहेत.

दरम्यान आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वाखरी येथील पालखी तळावर प्रशासनाने सोयी सुविधा तयार केलेल्या आहेत. येत्या 20 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी मानाच्या दहा पालख्यातील 400 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या दहा पालख्या 19 जुलैला वाखरी येथील पालखी तळावर एसटीने येणार आहेत. पालखी तळावर प्रत्येक पालखीसाठी स्वतंत्र मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली आहे.

येथून पुढे दीड किलोमीटर अंतरापर्यंत हे सगळे वारकरी पालख्यासोबत पायी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. त्यानंतर प्रत्येक पालखीतील दोन वारकरी पंढरपूरपर्यंत पायी जाणार आहेत. दरम्यान पालखी तळावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण पालखी तळाला लोखंडी बॅरेकेटिंग व जाळी लावून बंदिस्त केले आहे. फक्त पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांना पालखीतळावर प्रवेश देण्यात येणार आहे. येथील पालखी तळवरील मंडप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढाेले यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Price : सोनं १५०० रुपये स्वस्त; चांदीचा भाव ४ हजार रुपयांनी उतरला, अधिक मासात सुवर्णनगरीत ग्राहकांची चांदी!

Maharashtra News Live Update: अमरावतीत लागलेल्या आगीमध्ये लाडकीबहीण योजनेचे दस्ताऐवज जळून खाक

किरकोळ वाद चिघळला, रिक्षाचालकाला तरुणांकडून बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

नाष्टा, सहलीपासून घरखर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीत व्यवहार! "टीटीएम" च्या हिशोबाला कंटाळून पुण्यातील दाम्पत्याचा घटस्फोट

इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचे नेते; 'या' ५ मुद्द्यांवर झाले एकमत, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी

SCROLL FOR NEXT