Beed Jail Superintendent Cabin Valmik Karad Saam Tv News
महाराष्ट्र

Beed News : जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून मारण्याचा प्लॅन आखला, वाल्मिक कराडवर मीरा गितेंचा गंभीर आरोप

Meera Gite Big Claim about Walmik Karad : वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आपल्याला मारहाण झाल्याचा दावा महादेव गितेने केला. तसेच यासाठी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं आवाहन केलं.

Prashant Patil

बीड : बीड जिल्हा कारगृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना गिते गँगचे आरोपी महादेव गिते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. पण बीड पोलिसांनी या दाव्याचं खंडन करत दुसरीकडे पोलिसांनी महादेव गिते आणि इतर तीन कैद्यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवाना केलं आहे. हर्सुल कारागृहात महादेव गिते आणि इतर तीन कैद्यांना पोलीस घेऊन जात असताना बीड कारागृहाबाहेर आरोपींनी कॅमेऱ्यासमोर वेगळाच दावा केला. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आपल्याला मारहाण झाल्याचा दावा महादेव गितेने केला. तसेच यासाठी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं आवाहन केलं. यानंतर आता महादेव गितेच्या पत्नी मीरा गित्ते यांनी गंभीर आरोप केला आहे.

वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून आपल्या पतीला मारहाण करण्याचा प्लॅन आखला, असा आरोप मीरा गिते यांनी केला. त्यांनी एका प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'चुकीचं झालं आहे आणि सगळं काही खोटं आहे. मलाही माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत फोनवर माझंही बोलणं झालेलं आहे', असा दावा मीरा गिते यांनी केला.

'गुढीपाडव्याच्या अगोदरपासून त्यांची ही प्लॅनिंग सुरु होती. तुम्ही तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज मागवून घ्या. कुणी कुणाला मारलं ते स्पष्ट होईल. कारण माझ्या पतीला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यांना मारहाण झालेली आहे. एक तर ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय. त्यात त्यांना दवाखान्यात सुद्धा घेऊन गेलेले नाहीत, असा आरोप देखील मीरा गिते यांनी केला.

'इतक्या लवकर कशी ही हालचाल झाली? इतक्या लवकर त्यांना हलवण्यात आलं. म्हणजे यांची काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. याच गोष्टीसाठी ते काहीतरी करत आहेत. अक्षय आठवलेचं नाव घेण्यात आलं आहे. पण त्यांना तिथून का हटवलं नाही? त्यांना का तिथेच ठेवलं? असा सवालही मीरा गिते यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT