Political Shift in Ratnagiri Saam
महाराष्ट्र

रत्नागिरीत मनसेला धक्का; बडा नेता भाजपच्या गळाला लागला, शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार

Political Shift in Ratnagiri: नेते वैभव खेडेकर आणि शेकडो मनसे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडेल.

Bhagyashree Kamble

  • रत्नागिरीत मनसेला धक्का

  • वैभव खेडेकर भाजपात जाणार

  • शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांतच पार पडतील. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर राज्यात राजकीय वारे वेगानं वाहू लागले आहेत. फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना रत्नागिरीत मनसेला धक्का बसला आहे. मनसेचा बडा नेता भाजप पक्षात प्रवेश करणार आहे.

रत्नागिरीत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. नेते वैभव खेडेकर यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुंबईतील भाजप कार्यालयात खेडेकर शेकडो मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत. दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.

नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे देखील हजर राहण्याची माहिती समोर आली आहे. खेडेकरांसह मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

आज दुपारी चार वाजता मनसेचे पदाधिकारी रत्नागिरीतून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आज त्यांचा खेडमध्ये मुक्काम असणार आहे. उद्या सकाळी वैभव खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने एकत्रित रवाना होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT