vadhvan port Saam tv
महाराष्ट्र

vadhvan port : वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राची समृद्धी कशी होणार? जाणून घ्या

vadhvan port news : वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. वाढवण बंदर हे समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे. याविषयी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सविस्तर माहिती दिली.

Vishal Gangurde

वाढवण बंदर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचं सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. या वाढवण बंदरासाठी एकूण ७६००० कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. केंद्र सरकारने बंदराचं विकासकाम हातात घेतलं आहे. वाढवण बंदर देशातील दुसऱ्या क्रमांकांच बंदर ठरणार आहे. तर जगातील पाचव्या क्रमांकांचं बंदर ठरणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्राची समृद्धी कशी होणार, याविषयी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ महत्वाची माहिती दिली.

जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये वाढवण बंदराचे फायदे अधोरेखित केले. उन्मेष वाघ म्हणाले, 'वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडणार आहोत. वाढवण प्रकल्पाला खंबीरपणे पाठिंबा कोणी दिला. तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. वाढवण बंदराबाबत त्यांच्या मनात सुस्पष्टता आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी कसा वापर करता येईल. याबाबत त्यांच्या कल्पना स्पष्ट आहेत. त्यामुळे बंदराजवळ विमानतळ आणलं'.

'वॉररुमच्या पहिल्या बैठकीत इगपुरीच्या समृद्धीला मार्ग वाढवण बंदराला जोडण्याच्या सूचना दिल्या. वाढवण बंदर इगतपुरीतील समृद्धीला जोडलं तर नाशिक सव्वाशे किलोमीटर अंतरावर येईल. दोन्ही ठिकाण महामार्गाने जोडले जातील. जेएनपीएवरून नाशिकला पोहोचायला १ दिवस लागतो. कारण दिवसा ठाण्यात ट्राफिक होतं, असे वाघ यांनी सांगितलं.

'नव्या जोडणीमुळे उत्तर महाराष्ट्रातील फळे, उत्पादने तीन-चार तासांत पोहोचतील. तिथून दुबईत पोहोचतील. स्टोरेज, वाहतुकीत मोठी बचत होईल. त्यामुळे वाढवण बंदर नाशिकसाठी गेमचेंजर ठरणार आहे, असे वाघ यांनी पुढे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

मंत्री, खासदार, आमदारांचे तातडीने सर्व दौरे रद्द; भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर

Blood Clot: शरीरात 'ही' 7 लक्षणं दिसली तर समजा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यात

जमिनीचे तुकडे लेआऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT