Bapu Pathare  Saam Tv
महाराष्ट्र

Vadgaon Sheri Assembly Election 2024: वडगाव शेरीमध्ये एकाच नावाचे २ उमेदवार, दिग्गज नेत्याचं टेन्शन वाढलं

Maharashtra Assembly Election 2024: वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बापू पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण आता त्यांचे टेन्शन वाढले आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यातील चर्चेत असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बापू पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बापू पठारे यांच्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सद्या हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वडगाव शेरी गावातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढली होती. पण मंगळवारी याच मतदारसंघातून बापू बबन पठारे नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला. हे बापू पठारे श्रीगोंद्याचे आहेत. अशामध्ये बापू पठारे यांच्यासारख्या नावाचा उमेदवार कोणी उभा केला? असा प्रश्न बापूसाहेब पाठारेंसमोर पडला आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातून ज्यांनी उमेदवारी अर्ज केला आहे त्याच्या अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. छाननी दरम्यान हा प्रकार उघड झाला. बापूसाहेब पठारे यांच्या नावासारख्याच असणारा उमेदवार श्रीगोंद्याचा आहे. विरोधी उमेदवाराला आपला पराभव समोर दिसत असल्याने त्याला असा प्रकार करावा लागता असल्याचा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला आहे. बापू बबन पठारे यांनी आपल्या उमेदवारी अर्जात कर्जाचा तपशील, बँक खाते, बँक खात्यात किती रक्कम आहे हे काहीच नसल्याचा राष्ट्रवादीच्या बापू पठारे यांचा आक्षेप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Jobs: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; वर्षाला पॅकेज ५० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Nashik : नाशिक हादरले! पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Amboli Recipe: घरच्या घरी मऊ आणि चविष्ट आंबोळी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Warning signs of serious diseases: ही ७ प्रकारची दुखणी अंगावर काढू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT