नंदुरबारमधील १५ ते १८ वयोगटातील ९४ हजार मुलामुलींचे ३ जानेवारीपासून लसीकरण  SaamTVNews
महाराष्ट्र

नंदुरबारमधील १५ ते १८ वयोगटातील ९४ हजार मुलामुलींचे ३ जानेवारीपासून लसीकरण

नंदुरबार जिल्ह्यात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शाळाबाह्य मुला मुलींसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदूरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनुसार नंदुरबार जिल्ह्यात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शाळाबाह्य मुला मुलींसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ९४ हजार १२९ मुलामुलींना लस देण्यात येणार आहे. यासाठी नंदूरबार तालुक्यात ४, शहाद्यात २, व अक्कलकुवा, तळोदा, नवापूर धडगाव येथे प्रत्येकी एक केंद्र असणार आहे.

हे देखील पहा :

याबाबत राज्यस्तरावरून एकूण लोकसंखेच्या ४.८७ टक्के उद्दिष्ठ निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण ९४ हजार १२९ मुला मुलींना लस देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारी पासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सदर लसिकरणात लाभार्थींना COVAXIN लस देण्यात येणार आहे.

नंदूरबार जिल्हयात अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे १२ हजार २००, धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात १३ हजार ९८४, तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात ९ हजार ५०४, शहादा तालुक्यात शहरातील नागरी दवाखाना व तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात २३ हजार १९, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात १५ हजार १४८, तर नंदूरबार तालुक्यात शहरातील जे.पी.एन नागरी दवाखाना, नागरी दवाखाना माळीवाडा, जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार , ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे २० हजार २७३ मुलामुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सदर उद्दिष्ठ प्राप्त करण्यासाठी सुरुवातीस जिल्हास्तर व तालुकास्तरावर कोविड लसीकरण केंद्र उभारून लसीकरण करण्यात येणार आहे. या करीता सर्वेक्षण पूर्ण करून आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण बाबत आदेशित करण्यात आलेले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT