Google map location mistake Saam TV
महाराष्ट्र

Google map mistake : गुगलचा मॅपचा गोलमाल, विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शॉर्टकट मारला; UPSC चा अख्खा पेपरच हुकला

Google map location mistake : गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेक विद्यार्थ्यांना पेपरपासून वंचित राहिले आहेत, छत्रपती संभाजीनगर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Satish Daud

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आजवर इंटरनेटचा वापर खूपच वाढला आहे. कोणतीही महत्वाची माहिती हवी असेल, ती अनेकजण इंटरनेटवर शोधतात. प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठीही 'गुगल मॅप्स'चा सर्रास वापर करतात. पण काहीवेळा याच गुगल मॅपमुळे मोठी फजिती देखील होते. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे युपीएससीच्या पेपरसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांसोबत घडला.

आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेक विद्यार्थ्यांना पेपरपासून वंचित राहिले आहेत, छत्रपती संभाजीनगर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

दुसऱ्या शहरातून येथे परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची पुरेसी माहिती नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला. मात्र, याच मॅपने त्यांचा घात केला. परीक्षा केंद्राजवळ असूनही मॅपने विद्यार्थ्यांना १५ किलोमीटर दूरपर्यंत नेलं. जेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी आलो, असं विद्यार्थ्यांना समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे परीक्षा केंद्राची विचारणा केली. तेव्हा विद्यार्थी उभे असलेल्या ठिकाणाहून परीक्षा केंद्र १५ किलोमीटर दूर होते. त्यांनी तातडीने हवे त्या वाहनाने परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. मात्र, केंद्रावर पोहचण्यासाठी त्यांना ३ ते ५ मिनिटे उशीर झाला. याच कारणामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

वर्षानुवर्ष तयारी करुन परीक्षेला मुकावे लागल्याने तरुण-तरुणींना रडू कोसळले. घडलेल्या प्रकाराबाबत सांगताना विद्यार्थी म्हणाले, "आमच्या प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजचा पत्ता विवेकानंद महाविद्यालयात होता. या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही गुगल मॅपवर लोकेशन टाकले. तेव्हा हे कॉलेज शहराच्या बाहेर असलेल्या औद्योगिक नगरीत वाळूज पंढरपूर येथे असल्याचे मॅपने दाखवले".

"जेव्हा आम्ही शहरातून १५ किलोमीटरचा प्रवास करून वाळूज पंढरपूरला गेलो, तेव्हा या नावाचे कॉलेज तिथे अस्तित्वात नसल्याचं आमच्या लक्षात आलं. आजूबाजूच्या लोकांना आम्ही विचारलं असता, विवेकानंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर शहरात असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं".

"आम्ही मिळेल त्या वाहनाने पुन्हा शहराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत युपीएससीचा पेपर सुरू झाला होता. आम्हाला परीक्षेसाठी आतमध्ये जाऊ द्या, अशी विनंती आम्ही गेटवरील कर्मचाऱ्यांना केली. पण त्यांनी आमचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळे आम्ही जवळपास ५० विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित राहिलो". घडलेला प्रकार सांगताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT