Beed Heavy Rain Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Beed Heavy Rain : अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याला झोडपलं; तुफान गारपीटीचा VIDEO पाहाच

Beed Rain News : बीडच्या केज तालुक्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने कहर केलाय.

विनोद जिरे

Beed Unseasonal Rain : राज्यातील काही जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस सुरूच आहे. अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसल्याने नागरिकांची पुरती दाणादाण उडवली असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून महाभयंकर गारपीट होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

बीडच्या केज तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने कहर केलाय. तुफान पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तर मांगवडगाव आणि देवगाव येथे वीज पडून गाय आणि बैल ठार झाल्याची घटना देखील घडली आहे. (Breaking Marathi News)

कोणकोणत्या परिसरात झाली गारपीट?

केज तालुक्यातील नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडटासह गारपीट तुफान गारपीट झाली. या तुफान गारपीटीचा व्हिडीओ समोर आला आहे.

या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल तर मांगवडगाव येथे वीज पडून दत्तू मुळूक यांची गाय दगावली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या देखील विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.हाततोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहेत. झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Debit card lost: तुमचं डेबिट कार्ड हरवलंय? लगेच करा ही कामं

TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

Maharashtra Live News Update : सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण

भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण आलं समोर

Beed : महाराष्ट्र हादरला! हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT