unseasonal rain hits bhandara since two days Saam Digital
महाराष्ट्र

Bhandara Rain : भंडाऱ्यात वादळी पावसाचा तडाखा, तुमसर तहसील कार्यालयातील निवडणुकीच्या कामकाजाचा मंडप कोसळला

नाकाडोंगरी परिसरात जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. तुमसर येथे तब्बल अर्धा ते पाऊण तास वादळी पावसाने कहर केला. पावसापूर्वीच्या जोरदार वादळाने नागरिकांची त्रेधा उडविली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara :

भंडारा जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेत शिवाराबराेबरच घरांचे, मंडपाचे माेठं नुकसान झालं आहे. वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या (bhandara gondia lok sabha election) तयारीकरिता लावण्यात आलेला मजबूत टेन्ट वादळाने मोडून अक्षरशः खाली कोसळला. यामुळे टेन्ट पुन्हा उभा करावा लागणार आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार वादळासह हजेरी लावून झोडूपन काढले. वेगवान वाऱ्याने कुठे लग्नघरचे मांडव उखडले, झाडे कोसळली तर खांबे वाकली इतका वाऱ्याचा प्रचंड वेग होता. विशेषता नाकाडोंगरी, गोबरवाही, सिहोरा भागासह तुमसर शहराला वादळाचा फटका बसला.

नाकाडोंगरी परिसरात जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. तुमसर येथे तब्बल अर्धा ते पाऊण तास वादळी पावसाने कहर केला. पावसापूर्वीच्या जोरदार वादळाने नागरिकांची त्रेधा उडविली. कौलारू घरावरचे छप्पर, टिनाचे पत्रे उडाले तर प्लास्टिक ताडपत्र्या फाटून पार ऐसीतैसी झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुसळधार पाऊस बरसल्याने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी होते. तुमसर तहसील कार्यालयपरिसरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरिता लावण्यात आलेला मजबूत टेन्ट वादळाने मोडून अक्षरशः खाली कोसळला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT