Crime news Saam tv
महाराष्ट्र

सात बालकांवर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार; धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

आंबा आणि चिंच खाण्याच्या बहाण्याने अत्याचार

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

संजय डाफ

नागपूर: नागपूरात सात अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय. बर्डी पोलीस स्टेशन हद्दीत महाराजबाग परिसरात ही घटना घडली असून सात मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वसंतराव नाईक झोपडपट्टी भागातील मुलांना चिंच आणि आंबे खाण्याच्या बहाण्याने महाराजबाग परिसरात घेऊन जायचा, त्यानंतर मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. 8 ते 11 वयोगटातील मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडलीय. पोलिसांनी आरोपी मयूर मोडक याला अटक केली असून त्याच्याविरोधात कलम ३७७ आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. एका मुलाच्या तक्रारीनंतर इतरंही पालक तक्रारीसाठी पुढे आलेय. आणखी कुणासोबत आरोपीने अनैसर्गिक कृत्य केलं का? याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मानसिक विकृत आहेत का? याची तपासणी केली जातेय.

हे देखील पाहा-

दरम्यान, देशात अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. रोज नव्या घटना मोबाईल आणि टिव्हीच्या माध्यमातून ऐकण्यात येत असतात. अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना मोबाईलमुळे होत असतात असे सांगण्यात येते. तरूणांकडून अल्पवयीन मुली-मुलांना टार्गेट केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT